Wednesday, June 28, 2023

Interested in A.I.? MUST READ


First Artificial Intelligence University in Raigad District 


देशातील पहिले एआय तंत्रज्ञान म्हणजेच आर्टिफिशल इंटेलिजेंस तंत्रज्ञानाचं विद्यापीठ रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे होत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंस हे तंत्रज्ञान भविष्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. या प्रगत तंत्रज्ञानामुळे जग बदलेल असे म्हटले जाते.

 
युनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटी या विद्यापिठामध्ये १ ऑगस्टपासून पहिलं शैक्षणिक वर्ष सुरु होणार आहे.जिल्ह्यातील कर्जत येथे स्थापन करण्यात आलेले हे विद्यापीठ ग्रीन कॅम्पस असेल आणि त्याला महाराष्ट्र सरकारच्या उच्च तांत्रिक आणि शिक्षण विभागाने मान्यता दिली असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे. भारतातील अशा प्रकारचं हे पहिलं विद्यापीठ आहे. या विद्यापिठात एआयचा अभ्यास केला जाईल. हे विद्यापीठ एआय तंत्रज्ञानाच्या शिक्षणात महत्त्वाची भूमिका बजावेल.
 
युनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटी हे एआय आणि भविष्यातील तंत्रज्ञानातील विशेष पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. या अभ्यासक्रमांतर्गत येथे शिकणार्‍या विद्यार्थ्यांना एआय तंत्रज्ञानाबद्दल संपूर्ण माहिती आणि शिक्षण दिलं जाईल. यामध्ये व्हर्च्युअल रिलिटी आणि सुपर कॉम्प्युटरचे शिक्षण दिलं जाणार आहे. या विद्यापिठात एआय तंत्रज्ञानाच्या अभ्यासासाठी हायटेक क्लास रूम्स, सुपर कॉम्प्युटर आणि व्हर्च्युअल रिलिटी उप रणे अशी वेगवेगळी तयारीही करण्यात आली आहे.
 
एआय विद्यापीठामध्ये एआय तंत्रज्ञान आणि भविष्यातील तंत्रज्ञानामध्ये विशेष पदवीपूर्व आणि पदवीधर अभ्यासक्रम आहेत. तसेच जागतिक घडामोडी आणि मुत्सद्देगिरी, कायदा, पर्यावरण आणि क्रीडा विज्ञान यासारखे इतर नवे-जुने संमिश्र अभ्यासक्रम तयार केले आहेत. जग अधिक ऑटोमेशन आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन डे वाटचाल करत असताना, जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये देशाला स्पर्धात्मक राहण्यासाठी एआय शिक्षण आणि संशोधन महत्त्वाचं आहे.
 
एआय युनिव्हर्सिटीचं वैशिष्ट्येे एआय विद्यापीठाचं कॅम्पस मुंबईत स्थापन करण्यात आले आहे. येथे विद्यार्थ्यांना वेगळ्या पद्धतीने शिकवले जाईल. एआय विद्यापीठात हायटेक क्लास रूम, व्हर्च्युअल रिलिटी उपकरणे आणि सुपर कॉम्प्युटर बसवण्यात आले आहेत. प्रत्येक विषय शिकवण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. तरुणांना ऑगमेंटेड रिलिटी, मिक्स्ड रिलिटी, आयओटी, ब्लॉकचेन यांवर शिकण्यासाठी आणि प्रयोग करण्यासाठी लॅब तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे तांत्रिक ज्ञान वाढविण्यासाठी विविध साधनांचा वापर करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

BOOK REVIEW- IKIGAI

  Book Review on IKGAI This book is the best International Bestseller written by Hector Garcia and Francesc Miralles. The word ‘Ikigai is a ...