Tuesday, August 17, 2021

MY SPEECH AT VIKROLI

 इंग्रजी भाषेतून बाबासाहेबांचे लिखाण म्हणजे जगासाठी दीपस्तंभ - प्रा. प्रशांत साळवी


(मुंबई प्रतिनिधी):- भाषा म्हणजे आपले विचार प्रभावी व्यक्त करण्याचे साधन होय. सध्याच्या युगात इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे अत्यंत गरजेचे आहे. आनंद सेवा संघ संचालित, जेतवन बुद्ध विहार, टागोर नगर, मुंबई यांनी रविवार, दिनांक ८ ऑगस्ट २०२१ रोजी वर्षावास निमित्त प्राध्यापक प्रशांत साळवी यांनी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इंग्रजी भाषा' या आगळ्या - वेगळ्या  विषयावर उपस्थितांशी आपल्या व्याखानातून संवाद साधला..

सरांनी अतिशय वेगळा विषय निवडून बाबसाहेबांनी ४० पेक्षा अधिक पुस्तके आणि प्रबंधाचे मुद्देसूद विश्लेषण केले.


सरांनी सांगितले, " डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंग्रजी भाषेचे निष्णात व्यक्तीमत्त्व आहेत, त्यांचे इंग्रजी भाषेवर विषेश प्रेम होते

डॉ. बाबसहेबांनी आंबेडकरांनी इंग्रजी भाषेतून लिहिलेल्या पुस्तकांचा संदर्भ देऊन या पुस्तकांचा परामर्श प्रा. प्रशांत साळवी यांनी आपल्या व्याखानातून घेतला.

विशेष संदर्भ देतांना सरांनी, डॉ. बाबासाहेबांची आत्मकथा "Waiting For a Visa" आजही कोलंबिया विद्यापीठात पाठ्यपुस्तक म्हणुन अभ्यासक्रमास असल्याचे आवर्जुन सांगितले.. पुढे स्पष्टीकरण करतांना सरांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेबांचे Annihilation of Caste, हे आजही जगातले सर्वोत्तम खपाचे (Best Seller) पुस्तक आहे.

म्हणजेच बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजी भाषातील लिखाणामुळे जगासाठी ज्ञानाचा स्त्रोत निर्माण झाला.

इंग्रजी भाषेवर प्रभूत्व म्हणजे संपूर्ण जगावर अधिराज्य गाजवण्याची जणु गुरुकिल्लीच  हे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दाखवून दिले, असे सरांनी उपस्थितांना पटवून दिले. काळाची पाऊले ओळखून आपणही इंग्रजी भाषेची कास धरावी, इंग्रजी भाषा अवगत असेल तर आपल्याला करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होतात, त्याच बरोबर आपण आपली मातृभाषा सुद्धा समृद्ध केली पाहिजे, असे प्रा. प्रशांत साळवी यांनी अगत्याने सांगितले.

सदर कार्यक्रम आयोजन व यशस्वी करण्यात प्राध्यापक विनोद गाडे, बी.ए.पंड्डीत, सहदेव कांबळे, के. टी. सावंत, प्राध्यापक शैलेंद्र धांडोरे, प्राध्यापक प्राजक्ता साळवी, आनंद सेवा संघ आणि जेवतवन बुध्द विहार कमिटी यांनी मोलाचे सहकार्य केले.





No comments:

Post a Comment

2.2 Indian Weaver

                                          2.2 Indian Wear (Appreciation) About the poem/poet and the title: ‘Indian Weavers’ is by the renow...