१२ वी च्या परिक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांसाठी.........
मॉन्टी रॉबर्ट नावाचा घोड्याच्या तबेल्यात काम करणाऱ्या मजुराचा मुलगा होता. शाळेत शेवटच्या दिवशी सर्वांना निबंध लिहायला सांगितला ' माझे स्वप्न '
मॉन्टी रॉबर्टने निबंध लिहिला की एक दिवस माझ्या मालकीचा रेस कोर्स असेल, २०० ते ३०० अरबी घोडी माझ्याकडे असतील, गाडी बंगला अफाट पैसा आणि जगातला सर्वात श्रीमंत म्हणून मला ओळखलं जाईल...
निबंध लिहिला, निकाल लागला मॉन्टी रॉबर्टच्या वर्गातील सर्व मुले पास झाली, नापास झाला तो फक्त मॉन्टी रॉबर्ट
तो निकाल घेऊन शिक्षकेकडे गेला की मॅडम तुम्ही मला नापास केला आहे मला पास करा. मॅडम म्हणाल्या अरे वेड्या मी तुला जाणून-बुजूनच नापास केले आहे. मॉन्टी म्हनाला का ? अरे तू निबंध काय लिहिला आहेस तुझ्या मालकीचा रेस कोर्स असेल, २०० ते ३०० घोडी तुझ्याकडे असतील, जगातला श्रीमंत तू असशील अरे वेड्या स्वप्न पहावीत पण अशक्य कोटीतली नव्हे, विसरू नको की तू एका घोड्याच्या तबेल्यात काम करणाऱ्या मजुराचा मुलगा आहेस...
मॉन्टी रॉबर्ट म्हणाला मॅडम तुम्ही मला पास करा मॅडम म्हणाल्या तू तुझं स्वप्न बदल मी तुला पास करते तसा मॉन्टी रॉबर्ट म्हणाला की मॅडम आणा तो निकाल इकडे आणि निकाल घेऊन मॉन्टेरॉबर्ट तिथून निघून गेला...
वीस वर्षांनी त्याच शाळेची सहल एका रेस कोर्सला भेट द्यायला गेली त्यावेळी तिथल्या तरुण मालकाने त्यांच स्वागत केलं, त्यांना अख्खा रेस कोर्स फिरवून दाखवला, रेस कोर्स दाखवण्याचे पैसेही घेतले नाहीत. शेवटी त्या तरुण मालकाने त्या शिक्षिकांना विनंती केली की आजचा डिनर तुम्ही माझ्यासोबत कराल का ?
शिक्षिका सर्व मुलांना घेऊन त्यांच्या डिनर हॉलमध्ये आल्या, तर पाहिले कि हॉलमध्ये एक सर्टिफिकेट फ्रेम करून लावलं होतं; त्या शिक्षिका जरा जिज्ञासेन पुढे गेल्या त्याच्यावरचं नाव पाहून म्हणाल्या अरे हा तर आमच्याच शाळेचा निकाल आहे. कोण मॉन्टी रॉबर्ट का ? कुठे आहे तो तुमच्या रेस कोर्स वर कामाला आहे का? त्या वेड्याला सांगितलं होतं तुझं स्वप्न बदल तुला पास करते पण त्याने ऐकलं नाही. कुठे आहे बोलवा त्याला..
त्यावेळी तो तरुण मालक म्हणाला की मॅडम मीच मॉन्टी रॉबर्ट आहे. आणि मॅडम मी माझं स्वप्न पूर्ण केल आहे. तेव्हा जर तुमचं ऐकून माझं स्वप्न बदललं असतं तर मी शाळेच्या परीक्षेत पास झालो असतो पण आयुष्याच्या परीक्षेत मी नापास झालो असतो....
अपयश आलं म्हणून निराश होऊ नका या जगात काही अपवाद वगळता बहुतांश नापास झालेल्या ध्येयवेड्या लोकांनीच इतिहास घडवलेला आहे .